रत्नागिरी:- शहरातील पाच वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर भालचंद्र नागले (३८,रा. शांतीनगर, रत्नागिरी ), प्रमोद दिपक मसुरकर (३५, रा. शांतीनगर, रत्नागिरी ), सत्यजित उत्तम रसाळ (४७, रा. परटवणे सरोदेवाडी, रत्नगिरी ), मनोहर श्रीकृष्ण जांभळे (६४, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी ), अशोक देवू शितप (६०,रा. परटवणे, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (ता. २४) दुपारी पावणेएक ते सायंकाळी साडेचारच्या या कालावधीत शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडिअम, मांडवी, नाचणे-पॉवर हाऊस या ठिकाणी निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आडोशाला मद्यपान करत होते. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रोहीत मांगले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.