Friday, July 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सामायिक जमिन बळकावण्याचा प्रयत्न; ३ जणांवर गुन्हा दाखल

सामायिक जमिन बळकावण्याचा प्रयत्न; ३ जणांवर गुन्हा दाखल

कालुस्ते येथील घटना

चिपळूण:- तालुक्यातील कालुस्ते ग्रामपंचायतीसमोर असलेल्या फिर्यादींच्या सामायिक जमिनीत कोणताही हक्क नसताना बेकायदेशीररीत्या कंपाऊंड भिंत, गेट, कुलूप आणि पत्र्याची शेड बांधून ताबा घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी सामायिक जमिनीचा ताबा बळकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही घटना २१ एप्रिल २०२५ ते २१ जुलै २०२६ दरम्यान कालुस्ते येथील ग्रामपंचायतीसमोर, ता. चिपळूण येथे घडली असून २१ जुलै रोजी रात्री ८ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२९, ३(५) तसेच भा.द.वि.क. ४४७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मुश्ताक इसहाक परकार, वय ७२ वर्षे, व्यवसाय: डॉक्टर, मूळ रा. मौजे कालस्ते खुर्द, ता. चिपळूण, सध्या रा. शितल अपार्टमेंट, रु.नं. ४१/अ, चौथा माळा, गणपावडर रोड, स्टार टॉकीज समोर, माझगाव, मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार अब्दुल लतीफ हसन परकार, लुकमान अमीन परकार,
मोहम्मद सालेह अहमद परकार (आणि इतर सर्व रा. कालस्ते, ता. चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालुस्ते येथील गट क्र. ३०७ मधील सामायिक जमिनीवर आरोपींचा कोणताही कायदेशीर हक्क किंवा अधिकार नसताना त्यांनी या जमिनीवर कंपाऊंड भिंत, गेट, कुलूप आणि पत्र्याची शेड उभारली. याशिवाय, आरोपी क्रमांक २ हा या जागेवर नियमितपणे आपले चारचाकी वाहन उभे करून जागेचा वापर करत होता, तर आरोपी क्रमांक १ हा या बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या इसमांना सहकार्य करत होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.