खेड:- सामायिक घराच्या वाटप करण्याच्या वादातून किरकोळ कारणातून आपापसांत दोन गटांत वाद झाल्याची घटना तालुक्यातील शिवखुर्द पाटीलवाडी येथे ५ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्या असून, दोन्ही गटांतील ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी एका गटातील गणपत विश्राम डफळे (रा. शिवखुर्द) यांनी तक्रार दिल्यानुसार संशयित अमोल विलास डफळे, विलास विश्राम डफळे व दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीत त्यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ लाकडी दांड्याने मारहाण करून गणपत विश्राम डफळे, तेजस गणपत डफळे, गितेश गणपत डफळे, अलका गणपत डफळे (सर्व रा. शिवखुर्द श्रीरामवाडी, ता. खेड) यांना जखमी केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील विलास विश्राम डफळे (रा. शिवखुर्द, ता. खेड) यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून गणपत विश्राम डफळे व अन्य दोन जणांनी शिवीगाळ मारहाण व दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारी मध्ये नमूद आहे. या मारहाणीत फिर्यादीसह अमोल विलास डफळे (वय २८) हे दोघेजण जखमी झाले आहेत, असे तक्रारी नमूद केले आहे.









