रत्नागिरी:- तालुक्यातील ठोंबरेवाडी-साठरेबांबर येथे झाडावरुन खाली पडून जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. शिवाजी बाळका ठोंबरे (७४, ठोंबरेवाडी, साठरेबांबर, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
गुरुवार २० फेब्रुवारी रोजी ते आंब्याच्या झाडावरुन खाली पडले होते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला, दोन्ही हातांना दुखापत झाली होती. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बेशूध्द अवस्थेत प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांतर अधिक उपचारांसाठी मुंबई येथील के.ई.एम रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.