रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर येथील देवळाचा सडा येथे दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे गावठी हातभट्टीची दारू सापडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साठरेबांबर येथील देवळाचा सडा येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे विनापरवाना हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.