साठरेबांबर तेलीवाडी येथे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर तेलीवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगणाऱ्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २७ मे रोजी सायंकाळी ४.४५ वा. करण्यात आली.

यशवंत वसंत सागवेकर (३५, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ग्रामीण पोलिस साठरेबांबर परिसरात गस्त घालत असताना त्यांना यशवंत सागवेकर एका काजूच्या झाडाखाली बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ४३० रुपयांची ८ लिटर दारू हस्तगत केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.