Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी साखरपा येथे पतीने केले पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

साखरपा येथे पतीने केले पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

रत्नागिरी:- देवरुखजवळील साखरपा, तिवरे मेढे येथे दारूच्या नशेत पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या दारू पिण्यावरून झालेल्या वादातून संतापलेल्या नवऱ्याने लोखंडी कोयत्याने पत्नीच्या डोक्यात वार केल्याने तिला दुखापत झाली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे मेढे, साखरपा येथे राहणाऱ्या फिर्यादी महिला आपल्या घरी काम करत होत्या. त्यावेळी त्यांचे पती, २६ वर्षीय जयेश शांताराम नार्वेकर, नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आले. त्यांना दारू न पिण्याचा सल्ला फिर्यादीने दिला असता, जयेशने “तू मला काही सांगू नकोस, माझे मी बघतो,” असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या वादानंतर जयेशने रागाच्या भरात जेवणाच्या खोलीतून एक जुनी लोखंडी कोयती आणली आणि पत्नीच्या डोक्यात वार केले. यात त्याची पत्नी जखमी झाली. या घटनेनंतर महिलेने देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला. देवरुख पोलिसांनी या प्रकरणी जयेश शांताराम नार्वेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.