सहा वर्षात अंमली पदार्थांचे १२३ गु्न्हे

३२ प्रस्तांवांमधील ७ जण हद्दपार; १९ प्रलंबित

रत्नागिरी:- मुंबई, पुणे महानगरांप्रमाणेच आता रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.गेल्या सहा वर्षात यामध्ये वाढ होत राहिली आहे. सहा वर्षात पोलीसांनी १२३ गुन्हे दाखल केले आहेत. तर गांजा, चरस, ब्राऊनशुगर, ॲम्फेटामाईन यांची सातत्याने विक्री करणार्‍या ३२ जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षात विविध पोलीस स्थानकातून उपविभागिय अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील ७ जणांना रत्नागिरीसह शेजारील पाच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.तर १९ प्रस्ताव जिल्ह्यातील सर्व प्रांतांकडे प्रलंबित आहेत.अंमली पदार्थांचे समुळ उच्चटन करण्यासाठी प्रशासकीय कामाला गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

गेल्या सहा वर्षापुर्वीपासून अंमली पदार्थांची खुलेआम विक्री जिल्ह्यात सुरु झाली. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागाता याचे लोण जास्तच पसरले आहे. पोलीसांनी सातत्याने कारवाईची मोहिम सुरु ठेवली होती.मात्र अंमलीपदार्थ विक्रीत माहिर झालेल्या दलालांनी नवनवी क्लुप्त्या वापरुन अंमली पदार्थ विक्रीचे जाळे चांगलेच मजबूत केले आहे.

सन २०२०मध्ये १२ त्यामध्ये दुपटीने वाढ होत सन २०२१ मध्ये१२ गु्न्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सन २०२२ मध्ये १२ , सन २०२३ मध्ये या गुन्ह्यांमध्ये प्रंचड वाढ होत तब्बल ४६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सन २०२४ मध्ये २५ तर सन २०२५ मध्ये आतापर्यंत ५ गुन्हे दाखल झाले आहेत. अंमली पदार्थ विक्रेत्यांची साखUी निर्माण झाली आहे. परजिल्ह्यासह परराज्यातून थेट रेल्वे, एसटी बसमधून गांजा व अंमली पदार्थ थेट रत्नागिरीत पोहचत आहेत. तर त्याच त्याच व्य्ाक्ती गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याच व्यावसायत रहात आहेत. त्यामुळे यांना पोलीसांचा धाक वाटत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. २०२४ मध्ये एकूण २५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ३९ आरोपींना अटक करण्यात आली. ७ लाख १५ हजार ६५० रुपयांचे २३१ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ६ लाख ६६ हजार ५४ रुपये किंमतीचा ३२.८५८.५ किलोग्रॅम गांजा आणि ५० लाख ८९ हजार ६०० रुपये किंमतीचे १२.७२० किलोग्रॅम चरस यात जप्त करण्यात आले आहे. २०२५ मध्ये ६ गुन्ह्यांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात २ लाख २६ हजार २५० किंमतीचे २५.४ ग्रॅम बÏाऊन हेरॉईन, ३ लाख ७६ हजार १९७ रुपयांचा ७.६१६.५ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ७ आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पोलीस अंमलदारांची संख्या पुरेशी आहे. कोणत्या कोपर्‍यात काय सुरु आहे. याची माहिती पोलीसांना तात्काळ मिळते. पोलीसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यावर करवाईही केली जाते. मात्र त्यांचे स्ट्राँग नेटवर्क उद्धवस्त करण्यात अद्याप पोलीसांना यश आलेले नाही. त्यांची कारणे काहीही असली तरी सध्यातरी पोलीसांपेक्षा विक्रेत्यांचे नेटवर्क स्ट्राँग असल्याची चर्चा सुरु आहे.