रत्नागिरी:- सहकारात प्रामाणिकपणे काम केले तर निश्चित यश मिळू शकते. हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेत काम केल्यानंतर लक्षात आले, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव निकम यांनी केले. तसेच शेतकरी गरीब राहणार असेल तर देश गरीब होईल, असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी. कराड आणि मातोश्री स्वयंसेवी संस्था, रत्नागिरी चे संस्थापक उदय बने, हात्भार फाऊंडेशन रला, संस्थापक परशुराम कदम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ’कोकण गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, हुतात्मा अपंग बहुउद्देशीयचे अध्यक्ष डॉ. सुजित फडतरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय बने, माजी सभापती परशुराम कदम, कुमार शेट्ये यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील 25 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चोरगे म्हणाले, विविध क्षेत्रात काम करणार्या लोकांची निवड करून त्यांना पुरस्कार देण्याची उदय बने यांची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. बने यांचा जिल्हापरिषदेतील अभ्यास मोठा आहे. याबाबत त्यांच्याकडूनच शिकावे लागेल. विशेष म्हणजे अनेक संकटे आली तरीही त्यावर मात करत कारणे न देता लोकांना जेवढं योगदान देता येईल तेवढं दिले आहे. कोणतेही काम जिद्दीने आणि प्रामाणिकपणे केले तर त्याचं फळ मिळते. 2006 साली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद हाती आले. त्यानंतर चार वर्षात बँक नावारूपाला आली. महाराष्ट्रातील दोन नंबरची बँक म्हणून आज सगळीकडे ओळख निर्माण झाली आहे. बँक चालवताना शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही चांगल्या पध्दतीन काम करू शकलो.









