राजापूर:- तालुक्यातील चव्हाणवाडी येथे सलूनमध्ये घुसून तरुणाला जोरदार मारहाण करून त्याचे डोके फोडून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज पुरुषोत्तम चव्हाण (३०, राजापूर, चव्हाणवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, सुरज चव्हाण हा सलूनमध्ये गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास काम करत होता. यावेळी अचानक दोन तरुण सलून मध्ये घुसले. त्यानी सुरज याला जोरदार मारहाण केली. एकाने हातातील कड्याने सुरज याच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये सुरजच्या पाठीमागील बाजूने रक्त वाहू लागले.
मारहाण करून दोघेही पळून गेले. सुरज याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर ६ टाके टाकण्यात आल्याचे त्याने सांगितले. सुरज याने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल किली असून पोलिसांनी या तरुणांचा शोध घेत ते दोघे धोपेश्वर येथील असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. साहिल गुरव (२४), आयुष गुरख (२१, राजापूर धोपेश्वर, गुरववाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.