रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
नरेश शंकर आंबेकर (53, रा.गोळप- तोरस्करवाडी, रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ते घराजवळ काम करत असताना त्यांना अचानकपणे सर्पदंश झाला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. परंतू आंबेकर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा शासकिय रुग्णालयात तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी सर्पदंश झालेल्या नरेश आंबेकर यांच्यावर तात्काळ उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष शेखर घोसाळे व इतर पदाधिकार्यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धडक दिली होती.