सभामंडपात शुल्लक कारणावरुन हाणामारी, 4 जणांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील शिरसोली, मधलीवाडी येथे सभामंडपात वाडीतील गटार व पाखाडी बांधकामाबाबत चर्चा करीत असताना तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोघेजण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारीनुसार चौघांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.  10 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अरविंद शिवराम जाधव (60, शिरशेश्वर, शिरसोली, दापोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सभामंडपामध्ये वाडीतील गटार व पाखाडी बांधकामाबाबत चर्चा सुरु होती. यावेळी संतोष रामचंद्र जाधव, गणेश विठोबा जाधव (सर्व रा. शिरसोली, मधलीवाडी, दापोली) यांनी दारु पिवून येवून जोरजोरात आरडा ओरड करत अरविंद जाधव यांना शिवीगाळ केली. तुला खपवून टाकतो अशी धमकी देत हाताच्या ठोशाने, कपाळावर, छातीवर मारहाण करुन धकलाबुकल केली. तर सुनील शिवराम जाधव याने नाकाला जोरदार चावा घेवून दुखापत केली. यामध्ये 60 वर्षीय अरविंद जाधव हे जखमी झाले. त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सुनील जाधव, संतोष जाधव, गणेश जाधव यांच्यावर भादविकलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

तर दुस़र्‍या बाजूने सुनील जाधव (45, शिरसोली, मधलीवाडी, दापोली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या सभामंडपात पाखाडी बांधकामाबाबत चर्चा करीत असता अरविंद जाधव हा गटार व पाखाडीचे बांधकाम गेली चाळीस वर्षे झाले नाही असे बोलला त्यावेळी सुनी जाधव म्हणाले, माझ्या वडिलांनी पाखाडी केलेली आहे असे सांगितले. यावेळी अरविंद जाधव म्हणाले, ते गेले आता आम्हाला सांगून नका असे म्हणत, गणेश विठोबा जाधव यांचे अंगावर धावून गेले. यावेळी संतोष जाधव याने अडवण्याचा प्रयत्न केला असता अरविंद जाधव यांनी सुनील जाधव यांना धकलाबुकल करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दगडाने मारहाण करुन उजव्या हाताचा अंगठयाला चावा घेवून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे. सुनील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अरविंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.