रत्नागिरी:- तालुक्यातील सत्कोंडी येथील पायावटेवर चिरेबंदी पाखाडीवर घसरुन पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. प्रवीण लक्ष्मण शिगवण (वय ४७, रा. सत्कोंडी शिगवण वाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) सकाळी आठ ते पावणे दोनच्या सुमारास सत्कोंडी जाणाऱ्या पायवाटेवरचे चिरेबंदी पाखाडीवर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रविण शिगवण हे नेहमीप्रमाणे घरातून निघून गेले होते. पन्हळी ते सत्कोंडी जाणाऱ्या पायवाटेवरिल चिरेबंदी पाखाडीवर पाय घसरुन उपडी पडलेल्या स्थितीत होते. या बाबत पोलिस पाटील पन्हळी यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच जयगड पोलिस घटनास्थळी गेले. प्रविण यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









