सण साजरे करताना शासनाच्या निर्देशांचे पालन करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- पुढील महिन्यात येणारे बकरी ईद व गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झाली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साजरे करीत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
           

बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी  उपस्थित होते.
           

यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे येत असतात.  त्यामुळे चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यामधील मतभेद टाळण्यासाठी नागरी कृती दल, ग्राम कृती दल यांच्या स्थानिक स्तरावर बैठका घेवून मार्गदर्शन करण्यात येईल.   तसेच येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन सण साजरा करावा.