रत्नागिरी:- तालुक्यातील सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना हातभट्टी व विदेशी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत पद्माकर वाघधरे (वय ३२, रा. जयगड, सड्येवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास सड्येवाडी येथे एका घराच्या आडोशाला निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे २२ लिटर हातभट्टीची २ हजार २०० रुपयांची दारु व ८६० रुपयांच्या विदेशी मद्य सापडले. या प्रकरणी पोलिस शिपाई पी.डी. लोटणकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.