सकाळी अवकाळी पावसाची हजेरी; दुपारनंतर उकाड्यात वाढ

रत्नागिरी:- मंगळवारी सकाळी रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक मळभ दाटून आले आणि पावसाची रिपरिप सुरू झाली. काही कालावधी पावसाने रिपरिप सुरू ठेवली. सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात गारवा होता. मात्र त्यानंतर पुन्हा नैसर्गिक थंड हवामानाची जागा उष्म्याने घेतली.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पुढील काही दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्शवभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहरासह सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक मलभी वातावरण तयार झाले. अवघ्या काही मिनिटांत पावसाने देखील हजेरी लावली. काही मिनिट पावसाची रिपरिप सुरू होती. मागील काही दिवसंपासून रत्नागिरीत वातावरणात काही प्रमाणात वाढ झाली होती. मंगळवारी सकाळी पाऊस सुरू होताच तापमानात घट झाली. मात्र, दुपारनंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली. पुढील काही दिवस पावसाचा इशारा कायम देण्यात आला असून हवामानात सातत्याने बदल होतील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.