रत्नागिरी:- शहरातील संसारे उद्यान येथील नाना नानी पार्क येथे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास दोन गटात जोरादार राडा झाला. याबाबत पोलीस स्थानकात नोंद झालेली नाही.
सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हा राडा सुरु होता. या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. वारंवार असे राडे होत असतात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
राड्यांमुळे परिसरात कायमच दहशतीचे वातावरण असते. यापूर्वी अनेकवेळा याबाबत पोलिसांना येथील नागरिकांना कळविले आहे. मात्र अजूनही या गैर प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. काल झालेल्या मोठ्या राड्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय. येथे येऊन अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या टोळक्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.









