संशयावरून तरुणाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- संशयावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान मुल्ला आणि एक महिला असे संशयित आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ३०) दुपारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणास दोघांनी शिवीगाळ करत हाताच्या थापटाने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची तक्रार जखमी तरुणाने पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.