संगमेश्वर येथील बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष

संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उमेश मुकुंद पगणे या तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.

त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363, 366, 376 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4 आणि 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला रत्नागिरीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.

सरकारी पक्षाकडून एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षांमध्ये तफावत असल्याने आरोपीविरुद्धचे आरोप सिध्द न झाल्याचे न्यायालयाने नमूद करत त्याला निर्दोष मुक्त केले. आरोपीची बाजू ऍड. कुशल सावंतदेसाई यांनी मांडली.