संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेड खुर्द येथे डंपर आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम रशिद अन्सारी (45, भागूवला, मनडावली, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक अरुण शिवप्रसाद विश्वकर्मा हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन आरवली ते संगमेश्वर कुरधुंडा असे जात होते. यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने अस्लम अन्सारी हा कंटेनर (एमएच 46, एएफ 4069) घेऊन जात होता. आंबेड खुर्द येथे आला असता या कंटेनरने डंपरला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरमधील विरु कामता आदिवासी कौल (23,) तसेच डंपर चालक अरुण शिवपसाद विश्वकर्मा (30,) व अनिलकुमार सोहन आदिवासी कौल (24) हे जखमी झाले. तिघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालक अस्लम अन्सारी याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.