संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश यशवंत पवार (२८, रा. कळंबुशी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पवार याने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला असता त्याने ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने याबाबतची माहिती घरी सांगितली. २१ मे रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संगमेश्वर पोलिसांनी योगेश पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.