श्री गणेशाला वंदन करत मविआचे उमेदवार रमेश कीर यांचे मतदान

रत्नागिरी:- कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी बुधवारी सकाळी रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध अठरा हातांचा गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी सौ. नमिता कीर या देखील उपस्थित होत्या.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मी काम सातत्याने करत राहणार, पदवीधर उमेदवारांचे प्रश्न सोडवण्यासाठी, जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी कोकणातल्या शैक्षणिक संस्थांच्या मागे ठामपणे उभ राहण्यासाठी लढाई आपण लढत असून बेरोजगार पदवीधर नक्कीच महाविकास आघाडीला कौल देतील असे रमेश कीर यावेळी सांगितले.