शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

रत्नागिरी:- शासनाकडून शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. 7.5 एचपी पर्यंतचे कृषिपंप वापरणार्‍या शेतकर्‍यांसाठी ही योजना असून, एप्रिल 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याची घोषणा केली आहे.

त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. पाच वर्षासाठी या योजनेचा कालावधी आहे. त्यानुसार 2029 पर्यंत जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शासनाने एप्रिल 2024 ते मार्च 2029 अशा एकूण पाच वर्षासाठी मोफत विजेची घोषणा केली आहे.