शेट्येनगरमधील तो स्फोट गॅस सिलेंडरच्या लिकेजमुळेच

कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाचा अहवाल सादर

रत्नागिरी:- शहरालगतच्या शेट्येनगर येथील भीषण स्फोटाबाबत कोल्हापूर येथील फॉरेन्सिक अंतिम अहवाल रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आला आह़े. अहवालामध्ये घटनास्थळावरून कोणतेही स्फोटक पदार्थांचे नमुने आढळून आले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आह़े. त्यामुळे स्फोट प्रकरणी अनेक चर्चांना आता विराम मिळाला मिळाला आहे.

18 जानेवारी 2023 रोजी शेट्येनगर येथील ‘आशियाना' इमारतीमध्ये 4 वाजून 56 मिनिटांनी जोरदार धमाका झाला होत़ा. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात इमारतीचा स्लॅब कोसळून खाली आल़ा. तर किचन व हॉलसमोरील भिंतीच्या अक्षरक्ष ठिकऱया उडाल्या होत्य़ा. या स्फोटात फ्लॅटचे मालक अश्फाक अहमद काझी (52) हे गंभीर जखमी झाले होत़े. त्यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा. त्यांची पत्नी कनिज अश्फाक काझी (48, ऱा शेट्येनगर रत्नागिरी) व सासू नुरूनीसा अल्जी (70, ऱा मजगांव रत्नागिरी), असा एकूण 3 जणांचा मृत्यू झाला होत़ा. तर अश्फाक यांचा मुलगा अमार अश्फाक काझी (20, ऱा शेट्येनगर मुळ ऱा सोमेश्वर रत्नागिरी) जखमी झाला होत़ा.

शेट्येनगर आशियाना इमारतीमध्ये झालेला भीषण स्फोट नेमका कशामुळे झाला या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होत़ा. दरम्यान पोलिसांकडून विविध ठिकाणी झालेल्या स्फोटांचा आढावा घेण्यात येत आह़े. गॅस लिकेजमुळेच हा स्फोट झाला असल्याबाबत शक्यता सुरूवातीलाच वर्तविण्यात आली होत़ी. अपघातातील जखमी झालेल्या अश्फाक याने पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले की, लाईटचे बटण चालू केले असता अचानक स्फोट झाल़ा. मात्र गॅस लिकेजचा वास घरातील अन्य लोकांना कसा आला नाही याबाबत पश्न उपस्थित करण्यात येत होत़ा.

स्फोट प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली होत़ी. सुरूवातीच्या तपासामध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नसल्याने पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत होत़ी. त्याप्रमाणे कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाचे पथक रत्नागिरीत पाचारण करण्यात आले होत़े. या पथकाने देखील हा स्फोट गॅसमुळेच झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट केले होत़े. मात्र प्रयोगशाळेत तपासण्याकरून अंतिम अहवाल तयार करण्यात येईल असे या पथकाकडून स्पष्ट करण्यात आले होत़े. नुकताच यापकरणी कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाकडून अंतिम अहवाल रत्नागिरी पोलिसांना देण्यात आला आह़े. त्यानुसार कोणतेही स्फोटक पदार्थ अथवा त्यांचे अवशेष घटना स्थळावर आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आह़े.