शिवार आंबेरे येथे दुचाकी अडवून शिवीगाळ करत मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील शिवार आंबेरे येथे परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून तरुणाची दाने अज्ञातांनी दुचाकी भर रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवार 23 जून रोजी रात्री 11.20 वा. घडली.

याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात शरद देवीदा हुमे (37, रा.फिनोलेक्स नगर गोळप,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री फिर्यादी शरद हुमे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एके-3413) वरुन येत असताना दोन अज्ञातांनी संगनमताने त्यांची दुचाकी जबरदस्तीने थांवबली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेत ते पर जिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या कारणातून त्यांना हातांच्या थापटांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 341, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.