रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर-आठवडा बाजार येथून दुचाकी चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महादेव बापू काळे (वय ३७, रा. नगरपरिषद कॉलनी-चर्मालय, मजगांव रोड, रत्नागिरी) हे मंगळवारी शिवाजीनगर येथील आठवडा बाजार येथे दुचाकी (क्र. एमएच-०८ वाय ३७४९) घेऊन गेले होते. दुचाकी त्यांनी तेथील शौचालयाच्या समोरील रस्त्यावर पार्क केली होती. ती चोरट्याने पळविली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.