शिरशिंगे येथे कामगार युवकाचा निर्घृण खून

एस.आर.सिटी फार्म हाऊस येथील घटना

दापोली:- रायगड जिल्ह्यातील रोहा येथून दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे सेंट्रींगच्या कामाकरीता आलेल्या लुईस नामक कामगाराचा (वय अंदाज २४ वर्षे) या युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पथकासह धाव घेतली आहे. शिरशिंगे येथील रोशन मोरे यांच्या मालकीच्या एस. आर.सिटी या फार्म हाऊस वर हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काम करणारे कामगारांच्या भांडणामधून हा खून झाला आहे का? याचाही तपास सुरु आहे. याप्रकरणी मुळचा रोहा येथील असलेल्या राजेश बोडरे याला संशयित म्हणून पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. डोक्याच्या मागे जोरदार प्रहार करून निर्घृण खून झाल्याची ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

लुईस हा मूळ ओरिसा राज्यातील रहिवाशी असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याची बाकी माहिती शोधण्याचे काम सुरु आहे.यानंतर हे दोघे दापोलीतील शिरशिंगे गावातील पिंपळाचा माळ येथील एसआरसिटीमध्ये सेंट्रींगच्या कामाला ७ जानेवारी रोजी रुजू झाले.

राजेश आणि लुईस हे जर एकाच छताखाली कामाच्या ठिकाणी राहत होते. तर याचा खून झाल्यावर राजेशला आवाज कसा आला नाही ? याबाबत पोलिसांनी राजेशकडे सखोल चौकशी केली. त्याच्या प्राथमिक जबाबात विसंगती आढळून आली आहे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.