रत्नागिरी:- फिर्यादीकडे घराचा कायदेशिर ताबा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन वास्तव्य करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. कालावधीत शिरगाव तिवंडेवाडी येथे घडली.
निलेश मनोहर ठिक (रा.शिरगाव,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात तानाजी गुंडा मंडले (42,सध्या रा.शिवगंगा अपार्टमेंट परटवणे मुळ रा.सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिरगाव तिवंडेवाडी येथील घराचा कायदेशिर ताबा त्यांच्याकडे आहे. परंतू त्यांच्या परवानगीशिवाय संशयित निलेश ठिकने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश करुन वास्तव्य केले. याबाबत फिर्यादीने संशयिताकडे विचारणा केली असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत घर माझे आहे. तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोेलिस करत आहेत.









