शिक्षिकेबाबत अफवा पसरवणाऱ्या तिघा संशयितांवर गुन्हा

संगमेश्वर:- जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेबाबत अफवा पसरवून, शाळा सभागृहात आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत शेरेबाजी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जिल्ह्यात १३ जून ते २६ जून २०२५ यात घडली.

याप्रकरणी पीडिताने पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबरला तक्रार दिली आहे. संशयित सुनील दौलत दळवी, संदीप विष्णू नटे व संदीप जयवंत जाधव यांनी संगनमत करून फिर्यादीबद्दल वाईट अफवा पसरवल्या. याशिवाय सभेमध्ये सुनील दळवी याने लज्जा उत्पन्न करणारी शेरेबाजी केली. तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.