शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

लांजा येथील घटना; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल

रत्नागिरी:- लांजा येथे 11 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व 22 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी आशितोष अनिल जाधव (20, ऱा लांजा) असे आरोपीचे नाव आह़े 15 जुलै 2023 रोजी लांजा येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती.

याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशितोष याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकार पक्षाकडून ॲड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिल़े. गुह्यातील माहितीनुसार 15 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिडीता ही शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होत़ी. यावेळी आरोपी आशितोष हा पिडितेजवळ आल़ा त्याने तिच्यासोबत असलेल्या दोना मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास सांगितल़े त्यानुसार घाबरलेली दोन्ही मुले वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास निघाली.
पिडीता ही एकटीच राहिली असल्याचे पाहून आरोपी याने पिडितेचा जबरदस्तीने हात पकडल़ा तसेच जवळच असलेल्या एका शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजुला ओढत घेवून गेला. याठिकाणी आरोपी याने पिडितेवर अत्याचार केला. तसेच घडला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल़ी घरी परतल्यानंतर पिडिता ही घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी पिडीतेला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घटना नातेवाईकांसमोर उघड केली.

याप्रकरणी पिडितेच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 (ए)(बी), 504,506 तसेच बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6, 8,9 (एम),10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा गुह्याचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक प़ी. व्ह़ी. देशमुख यांनी केल़ा तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षिदार तपासण्यात आले. पिडितेसोबत असलेल्या एक शाळकरी मुलाची देखील साक्ष नोंदविण्यात आली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व 22 हजार रुपये दंडाशी शिक्षा ठोठावल़ी न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी काम पाहिले.