शारीरिक संबंध ठेवत सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा 

रत्नागिरी:- पिडीत अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून, तिच्या नावाने सोशल मिडियाच्या फेक अकाऊंट तयार करुन तिची बदनामी करणाऱ्या आरोपीला विशेष पॉस्को न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास व ५ लाख ३५ हजाराचा दंड ठोठावला.

नितीन संजय जाधव (वय २६), रा. काटवली, ता. संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना जून २०१७ ते १२ डिसेंबर २०१७ कालवधीत घडली आहे. आरोपीने पिडीत मुलीला फोन करुन, व्हॉटसअप मॅसेज करुन जवळीक साधली व तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन बदनाम करण्याची धमकी देऊन तिला काटवली येथे नेऊन जंगलमय भागात तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळ्या घरात दुचाकीवरुन नेऊन पिडीत अल्पवयीन मुलीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो स्वतःचे मोबाईलद्वारे काढले. त्यानंतर पिडीत मुलीच्या नावाचे सोशल मिडीयावर फेक अकाऊंट तयार करुन पिडीतेचे विवस्त्र अवस्थेतील काढलेले फोटो प्रसिद्ध करुन तिची बदनामी केली. या प्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांना देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी भादवी कलम ३७६ व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, ३, ४, ११, (५) १२ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६६ (ई) ६७ (ए) (बी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास देवरुख पोलिस

निरीक्षक एस. एल. पाटील करत होत्या. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होता. आज या खटल्याचा निकाल रत्नागिरीतील पॉस्को विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. या गुन्हा कामी १४ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ३७६ खाली ७ वर्षे शिक्षा ५ हजार दंड, ३७६ (२) (आय) १० वर्षे शिक्षा सश्रम कारावास, ५ हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, ३७६ (जे) १० वर्षे सश्रम कारावास, ५ हजार दंड, दंड न भरल्या ६ महिन्याची कैद, ३७६ (एन) १० वर्षाची सश्रम कारवास ५ हजार दंड, दंड न भरल्या ६ महिने साधी कैद, पोस्को (४) ७ वर्षाची सश्रम कारावास ५ हजार दंड, सहा महिने कैद, पोस्को (१२)मध्ये ३ वर्षाचा सश्रम कारावास, ५ हजार दंड, ६ महिने साधी कैद, पोस्को (१४) मध्ये ५ वर्षे शिक्षा ५ हजार दंड व ६ महिने साधी कैद. तर माहिती तंत्रज्ञान ६६ (इ) मध्ये ३ वर्षाची सश्रम कारावास व २ लाख रुपये दंड, ६७ मध्ये ३ वर्षाची सश्रम कारावास ३ लाख रुपये दंड अशी एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा दंड व १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालायाने ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल आयरे, वर्षा चव्हाण, सचीन भुजबळराव यांनी काम पाहिले.