रत्नागिरी:- नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.हि कारवाई बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी केली.
शहरात एकामागोमाग एक धाड सत्र सुरु झाले आहे. रविवारी परटवणे येथे जुगार अड्यावर धाड टाकून शहर पोलिसांनी कारवाई केली होती.त्यापाठोपाठ नवीन भाजीमार्केट परिसरातील एका ईमारतीट दुसर्या मजल्यावर असलेल्या क्लबमध्ये जुगाराचा मोठा डाव बसला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.हि माहिती मिळताच शहर पोलिसांचे एक पथक नवीन भाजीमार्केट परिसरात दाखल झाले होते.
यावेळी इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या क्लबमध्ये शहर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या अभिजित प्रकाश चव्हाण (वय -35 वर्ष , रा . प्लॅट नं . 101 , पहीला मजला , दत्तात्रय अपार्टमेंट , तेली आळी रत्नागिरी), किशोर महादेव भाटकर (वय 50 वर्ष , रा . घर नं . 929 भंडारवाडी गावखडी,रत्नागिरी), किशोर तुकाराम मोरे (वय -51 वर्ष , रा . घर नं . 725 ब मयेकरवाडी , शरिगांव,रत्नागिरी), वैभव दिगंबर शविलकर (वय -36 वर्ष , रा . आलावा , जाकीमिर्या , ऋषिकेश हरिश्चंद्र शविलकर (वय 42 वर्ष , रा . घर नं . 3419 , पंधरामाड , मुरुगवाडा , रत्नागिरी), राजेश हरिश्चंद्र चव्हाण (वय -50 वर्ष , रा . घर नं . 183 , गणेशनगर , बाणेवाडी , नाटे , ता . राजापुर),इम्तियास इस्माईल पिलपिले( वय 60 वर्ष , रा . घर नं . 4500 लांजेकर कंपाऊउ , शेटयेनगररत्नागिरी), अब्रार करीम फकीर (वय -54 वर्ष , रा . | गणेशमंदीर समोर , उक्ताड , ता . चिपळुण), रमेश रामचंद्र दळी (वय 50 वर्षे , रा . मारुती आळी , रत्नागिरी) संजय बाबी सुर्वे ( वय 48 वर्षे , सध्या रा . विदुर स्मृती नवीन भाजी मार्केट), दिलीप दत्ताराम मोरे (वय 45 वर्षे सध्या रा . विदुर स्मृती नवीन भाजी मार्केट , ता . जि . रत्नागिरी ( मूळ रा . नागाव , ता . माणगाव , जि . रायगड ),सचिन शंकर कुलकर्णी , (वय 40 वर्षे , रा . पुष्पेंद्र कॉम्प्लेक्स , शेरेनाका), जगन्नाथ दगडु यादव (वय 48 वर्ष , रा . निवे बुद्रुक , सरोदेवाडी , ता . संगमेश्वर) ,) नागनाथ शिंगोबा करडे(वय 60 वर्ष , रा . घर नं . 248 , साई चौक , जेल रोड), राजेशकुमार रमेश (वय -25 वर्ष , रा . गढी , ता . बंदकी , जि . फतेहपुर राज्य उत्तरप्रदेश) यांना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले.
जुगार खेणाऱ्या १५ जणांविरोधात पोलिसांनी महारष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करून सर्वाना पोलीस स्थानकात नेले.या कारवाईत पोलिसांनी पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.