व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

दापोली:- दापोलीत वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून अंबरग्रीस म्हणजेच देवमाशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटकेत असलेले युवराज मोरे (४८, रा. मुंबई), संजय धोपट (३७, रा. करजगाव), नीलेश साळवी (३८, रा. करंजाणी) आणि सिराजथ शेख (३८, रा. मुंबई) यांना दापोली न्यायालयाने ३० ऑ क्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी पहाटे दापोली एसटी स्टँड परिसरात कस्टम ४ विभागाने केलेल्या दापोली बसस्थानक कारवाईत परिसरात झाली होती कारवाई किलो ८३३ ग्रॅम वजनाचा संशयित पदार्थ जप्त करण्यात आला होता. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली. कस्टम विभागाच्या पथकाने मारुती वॅगन आर या वाहनातून संशयित पदार्थ जप्त केला. आरोपींना वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास व. अधिकृत पडताळणीसाठी जप्त केलेली देवमाशाची उलटी दापोली वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली. पुढील तपास दापोली वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.