व्यापारी अपहरणप्रकरणी सहा जणांना न्यायालयीन कोठडी

देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी ६ जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी सहा जणांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. मुदत संपल्याने सहा जणांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ६ जणांना १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींनी आपल्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली आहेत. मात्र हे साथीदार पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.