रत्नागिरी:- वेल्डिंग वर्कशॉपचे शटर उघडून वर्कशॉपमधील ८३,८०० रूपयांचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन इब्राहीम मापारी (वय ६९, रा. नायाबनगर, कोकणनगर) यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे. मापारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोकणनगर येथील त्यांच्या साई वेल्डिंग वर्क्स या दुकानाचे शटर उघडून शौकत दाऊद मालदार व नसीम शौकत मालदार (दोघेही राहणार कोकणनगर) या संशयितांनी दुकानातील ८३,८०० रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला तसेच मापारी यांनी लावलेले कुलूप काढून टाकून त्या ठिकाणी स्वत:कडील कुलुप लावून या वेल्डिंग शॉंपमध्ये जाण्यास त्यांना मज्जाव केला.
याप्रकरणी यासीन मापारी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शौकत दाऊद मालदार व नसीम शौकत मालदार या संशयितांंविरोधात भा.दं.वि.क. ४६१, ३८०, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.