रत्नागिरी:- शहरानजीक एमआयडीसी- मिरजोळे येथील वेरॉन कंपनीचे लोखंडी शेडमधील पीडीसी डिपार्टमेंट मध्ये ठेवलेले रॉ मटेरिअल लोंखडी जाळीचे चौकोनी बॉक्सची जाळी उचकटून सुमारे १लाख २४ हजार ५०० रुपयांचे ८३० किलो वजनाचे ११८ नग ॲल्युमिनियम इनगॉट अज्ञात चोरट्याने पळविले. अज्ञात चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत वेरॉन कंपनीचे प्लॉट नं. डी-७१ येथील उघड्या लोखंडी शेडमध्ये
घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी-मिरजोळे येथे वेरॉन कंपनीचे उघड्या लोखंडी शेड आहे. त्यामध्ये पीडीसी डिपार्टमेंट मध्ये ठेवलेल्या रॉ मटेरिअल लोखडी जाळीचे चौकोनी बॉक्सची जाळी अज्ञात चोरट्याने उचकटून ८३० किले
वजाने ११८ नग ॲल्युमिनियमचे इनगॉट असे १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला. या प्रकरणी गणेश द्यानंद तुरेराव (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, साळवी स्टॉप, मुळ ः सोलापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









