वृद्धेला धडक देत मृत्यूस कारणीभूत चालकाला अटक

रत्नागिरी:-रविवारी सायंकाळी गणपतीपुळे ते चाफे जाणार्‍या रस्त्यावर वृध्देला धडक देउन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार चालकाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

अल्लाउद्दीन पठाण (रा.सोलापूर) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पठाण आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (एमएच -13- बीएन-5531) भरधाव वेगाने घेउन जात होता.धामणसे येथे त्याचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या उजव्या बाजुला जाउन समोरुन येणार्‍या सुलोचना तुकाराम सांबरे (65,रा.सांबरेवाडी धामणसे,रत्नागिरी) यांना धडक देत अपघात केला होता. यात त्यांचा डोक्याला आणि हाता-पायांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.