विषारी द्रव्य प्राशन केलेली महिला रुग्णालयात

रत्नागिरी:- सोनगिरी (ता. संगमेश्वर) येथील वृद्ध महिलेने अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची तब्बेत स्थीर आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोद करण्यात आली आहे. अरुणा अशोक खातू (वय ६६, रा. सोनगिरी, ता. संगमेश्वर) असे उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरुणा हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिचा मुलगा अनिकेत खातू यांच्या लक्षात येताच त्याने तात्काळ उपचारासाठी संगमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून तिची तब्बेत स्थीर आहे.