रत्नागिरी:- विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी मायाराम रामप्रसाद चौधरी ( वय २४ रा.मूळ नेपाळ, सध्या रत्नागिरी) याला अटक केली असून त्याला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पिडित विवाहितेने ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार मायाराम चौधरी हा बागेत काम करतो. विवाहिता एकटीच असल्याचा फायदा घेत मायाराम याने विविहितेवर दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास अत्याचार केला. त्यानंतर या घटनेची माहिती विवाहितेने जवळच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने महिलेने ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांना मायाराम रामप्रसाद चौधरी याच्या विरोधात भादंविक ३७६ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालायत हजर केले असता त्याला २ जानेवरी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक मीरा महामूनी करत आहेत.