विवाहितेच्या शारीरिक, मानसिक छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

खेड:- खेड तालुक्यातील सुकिवली-साबळेवाडी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिल्याचे समीक्षा समीर साबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीनुसार पती समीर साबळे, सासू शुभांगी सुभाष साबळे व सासरे सुभाष शिवराम साबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पतीसह सासू, सासरे एप्रिल २०२१ ते २ एप्रिल २०२३ या कालावधीत वडिलांकडून सोन्याचे दागिने आण, अशी सातत्याने मागणी करत होते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दागिने देऊ शकले नाही. तसेच, मुलगी झाल्याचा राग मनात धरून संगनमताने मानसिक व शारीरिक छळ करून घरातून हाकलून दिल्याचे समीक्षा साबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.