विवाहितेच्या छळ प्रकरणात नवरा, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

दाभोळ:- दाभोळ येथे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात नवरा व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पती राकेश शेटे, सासरे विठ्ठल शेटे हे २० डिसेंबर २०१५ पासून ते १८ फेब्रुवारी २३ पर्यंत कामात व जेवणात चुका काढून तसेच विवाहात झालेला ६ लाख रूपयांचा खर्च तुझ्या माहेरच्या लोकांकडून घेवून ये, आम्ही तुला लग्न करून येथे या कामाकरिताच घेवून आलेलो आहे असे बोलून वादविवाद करून आईवरून शिव्या देत छळ करत होते, तसेच दमदाटी करून तू येथून निघून गेलीस तरी चालेल, आम्हाला काहीही फरक पडणार नाही अशी धमकी दिली आहे. तसेच या विवाहितेला मूल होऊ नये म्हणून गोळ्या खाण्यास पती व सासरे बळजबरी करीत होते, असे दाभोळ पोलीस ठाण्यात या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. एन. ढोले करीत आहेत.