विनापरवाना दारु विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील देऊड फाटा येथे ग्रामीण व शहर पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर केलेल्या कारवाईत १ हजार ८६० रुपयांची दारु जप्त केली. दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गणपत कळंबटे (४३, रा. मळगाववाडी, करबुडे सध्या चाटवळवाडी देऊड, रत्नागिरी) व शैलेश अनंत सावंत (४५ रा. शिळ, वाघजाई वाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. २४) दुपारी साडेचारच्या ते पावणेसाहच्या सुमारास देऊड फाटा चाटवळवाडी व शिरगाव तिवंडेवाडी येथे निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांना विनापरवाना १ हजार ८६० रुपयांची दारु विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस शिपाई मंदार कोळंबेकर व पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.