रत्नागिरी:- विवाहितेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून रत्नागिरीतील अमेय सदाशिव चवरेकर याची न्यायालयाने निर्दोष मुक्ताता केली आहे. सन २०१५ मध्ये हि घटना घडली होती. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी अमेय सदाशिव चावरेकर याच्या विरोधात भादंविक ३५४ ब, ४५१ नुसार गुन्हा दाखल केला होता. यावेळी अमेय चावरेकर याने त्याला मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती.
याबाबत मुळात अमेय चवरेकरला पिडीत महिलेने स्वत:च तीच्या सदनिकेमध्ये बोलावले होते. व आर्थिक देण्याघेण्यावरुन शिविगाळ व मारहाण केली होती असे त्याचे म्हणणे होते. दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्यांचे खटले येथील न्यायालयात स्वतंत्र चालविण्यात आले होते. यावेळी विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयाने अमेयला शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यांने जिल्हा न्यायालायत अपिल दाखल केले होते. याच दरम्यान दोन्ही गुन्ह्यांचे खटले स्वतंत्रपणे वेगवेगळ्या न्यायालयात चालविण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दर्शनास आल्याने न्यायालायाने पुर्वी दिलेले आदेश रद्द करुन दोन्ही गुन्ह्याची सुनावनी एकत्रीत घेण्याचे आदेश खालील न्यायालयाला दिले होते. त्यानुसार दोन्ही खटले एकाच न्यायालयात चालविण्यात आले.
यावेळी सहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकिय पुरावा व दिलेली साक्ष यात तफावत आढळून आली. तसेच सहा साक्षिदारांच्या जबानीत विसंगती आढळून आली. सुनावनीअंती संशयाचा फायदा घेवून अमेय चावरेकर याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. संशयीत आरोपीच्यावतीने ॲड.प्रदिप नेने , ॲड.मधूरा आठल्ये, ॲड. शरमत मुळ्ये, ॲड.चिन्मय बोरकर, ॲड.श्रृती कांबळे, ॲड.विश्वनाथ दापके,ॲड.शर्वरी पाटील यांनी काम पाहिले.