रत्नागिरी:- दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील पाली नजीकच्या एका शाळेतील पहिलीत शिकणा-या तीन मुलीशी अश्लील चाळे करणा-या शिक्षकाचा जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने फेटाळाला.
रमेश रतन जाधव (५१, रा. मूळ रा. नाणीज, बौध्दवाडी) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. रत्नागिरी तालुक्यातील या शाळेत २४ डिसेंबर २०२१ रोजी गणवेश वाटप करण्यात आले. गणवेश वाटपाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या शिक्षकाने वर्गातील ३ मुलींना थांबायला सांगितले. वर्गातील अन्य विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर या शिक्षकाने या ३ मुलींशी अश्लील चाळे केले. दुपारी १.३० ते २ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली होती.
सध्या रमेश हा न्यायालयीन कोठडीत आहे. रमेश याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता पण तो अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने फेटाळला आहे.