रत्नागिरी:-आरोग्य यंत्रण सक्षम करण्यासाठी आवश्यकता लोकांची ओळखून रुग्णवाहिकांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला आहे. तसेच वित्त आयोगातूनही आणखीन हव्या असलेल्या वीस रुगणवाहिकांचीही पुर्तता केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले.
जिल्हा परिषदेला खनिकर्म आणि राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 14 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
ऑनलाईन प्रणालीद्वारे ते या कार्यक्रमात झाले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, परशुराम कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी अधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी पालकमंत्री अॅड. परब यांनी अध्यक्ष विक्रांत यांना चांगले काम करत असल्याची पोचपावती दिली. लोकांची गरज ओळखून काम करत राहण्याची बाळासाहेबांची शिकवणीप्रमाणे काम करण्याची सुचना त्यांनी केली. मंत्री सामंत यांनीही कोरोनातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगितले. तसेच प्रास्ताविकात विक्रांत यांनी जिल्हा परिषद आरोग्य कोरोविरोधातील लढ्यात चांगले काम करण्यास सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.