विकृत! जोगवा मागणा-या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार

खेड:-  तालुक्यातील व  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणानाका येथील काळकाई मंदिराच्या परिसरातील गॅरेज जवळील मैदानावर जोगवा मागणारी महिला आपल्या दोन मुलांसह पतीसोबत झोपली होती. तर एका अज्ञाताने झोपलेल्या महिलेच्या अंगाशी लगट करीत अतिप्रसंग करीत असताना  तिने आरडाओरड करून पतीला झोपेतून उठवले. अतिप्रसंग करणा-या अज्ञाताला विरोध केला. याचा राग मनात धरून अज्ञाताने आपल्या जवळील लाकडाच्या दांडक्याने डोक्यात वार करून पती सुरेश काळे याला गंभीर दुखापत केली.

 जखमी कामे यांना कळबणी बुद्रूक उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार करून पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना दि 21 मे रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. विनयभंग गुन्ह्याप्रकरणी पोलीस अज्ञाताचा तपास करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण केले होते. आरोपीचा कसून तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी दुर्गम्मा सुरेश कामे (वय 25 सध्या रा. भरणा नाका, मुळगांव धनगरड्डा इमानवत, ता. गुलबर्गा  राज्य कर्नाटक) यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली. 

 फिर्यादी ही आपल्या दोन मुल व पती सुरेश काळे समवेत भरणा नाका येथील काळकाई मंदिर परिसरातील गॅरेज जवळील मैदानावर झोपले होते. एका अज्ञाताने झोपलेल्या महिलेच्या अंगाशी लगट करीत अतिप्रसंग करीत असता. आपल्या पतीला उठवले. पत्नीशी लगट करणा-या अज्ञाताला हटकले असता. त्याचा राग मनात धरून अज्ञाताने लाकडाच्या दणक्याने महिलेचा पती सुरेश काळे याच्या डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात येथील पोलीसात विनयभंगाचा गुन्हा येथील पोलीसात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.