रत्नागिरी:- वाहन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून एकाला जबर मारहाण करणार्याला ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री ९.३० वा.अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मारहाणीची ही घटना शनिवार २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वा. हातखंबा येथील होळी कुठाजवळ घडली होती.
सागर प्रकाश कदम (३१ रा. कदमवाडी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात बालाजी सुभाष ठेंगिल (२६,रा.झरेवाडी, रत्नागिरी ) याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार,या दोघांमध्ये वाहन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून वादविवाद आहेत. यातूनच शनिवारी रात्री सागरने बालाजीला शिवीगाळ करत लोखंडी फाईट आणि हॉकी स्टिकने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती.