वाटद येथील राजेश जंगम खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटव खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. खून प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याने निलेश भिंगार्डे व अन्य एका साथिदाराच्या मदतीने राकेश याचा गळा आवळून खून केला होता. यानंतर मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला. असा गुन्हा राकेश याच्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी निलेशला सांगली येथून अटक केली होती.

मागील तीन महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या निलेश याने सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यातील माहितीनुसार 6 जून 2024 रोजी दुर्वास पाटील याने कोल्हापूर येथे जाण्याचा बहाणा करुन राकेश जांगम याला त्याच्या कारमधून नेले, यावेळी कारमध्ये दुर्वास याच्यासोबत निलेश भिंगार्डे, व अन्य एक संशयित होता. आरोपिनी कारमध्ये राकेशचा गळा आवळून खून केला तसेच मृतदेह आंबा घाटात फेकून दिला. अशी बाब पोलिसांच्या चौकशीमध्ये उघडकीस आली होती.जामीन अर्जाच्यावेळी निलेश याच्या वकिलांकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, मुख्य आरोपी दुर्वस पाटील याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली असता त्याच्या चौकशीत या गुन्ह्याची माहिती मिळाली, त्या खुलाशावरूनच राकेशला अटक झाली असून त्याच्याविरुद्ध स्वतंत्र पुरावा नाही. आरोपीला जामीन दिल्यास तो न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करेल. तसेच पोलिसांच्या तपासामध्ये सहकार्य करण्यास तयार आहे. परंतू न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला.