वाटद-खंडाळा येथे बिहार येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- मद्यपान करणाऱ्या बिहार येथील तरुणाने मद्याच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मदन मोहन कामटी (वय ३५, मुळः हरीरपूर बक्षीटोल ता. कलवाही जिल्बा मधूबनी राज्य बिहार. सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या बिहार येथील तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १९) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मदन कामटी याला मद्याचे व्यसन होते. मद्याच्या नुसेत स्वतः रहात असलेल्या भाड्याच्या घरात सिलिंग फॅनला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. तात्काळ त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.