वरवडे येथे शिवीगाळप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे- खारवीवाडा येथे मुलीला बोललेल्या गोष्टीचा जाब विचारणा केली. या रागातून शिवीगाळ केल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश नारायण पावसकर (वय ४२) व अन्य दोन महिला (सर्व रा. वरवडे, खारवीवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता.१७) दुपारी दीडच्या सुमारास वरवडे भंडारी, खारवीवाडा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांनी त्यांच्या मुलीला बोललेल्या गोष्टीचा जाब विचारण्याकरिता संशयित एका महिलेच्या घराजवळ जाऊन विचारले. त्याचा राग संशयित एक महिला व संशयित महेश पावसकर आणि अन्य एका स्त्रीला राग आला. संशयित फिर्यादी महिलेच्या घरात घुसून फिर्यादी यांचे दीर केशव शांताराम पोवार आणि त्यांची जाऊ कामानी केशव पोवार यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादी महिलेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.